तू...
तू...
मी तुझी होणे एक पेच आहे
तुझे दूर जाणे ह्रदयी ठेच आहे
सोडवू पाहता गुंता प्रश्नोत्तरांचा
अंतर आपल्यातले अजूनही तितुकेच आहे
रोज तुझ्या विचारांचे मनात काहूर आहे
काळजीने एक अनामिक हुरहूर आहे
तू आसपास माझ्या नसलास जरी
संगीतात माझ्या अजूनही तुझा सूर आहे
आपले नाते असे एक कोडेच आहे
वास्तव आपल्या स्वप्नांच्या उलटेच आहे
सुखी असलो एकमेकांशिवाय जरी
प्रार्थनेत माझ्या अजूनही तूच अन तूच आहे