आलास का पावसा?
आलास का पावसा?
आलास का पावसा? जरा पुन्हा भिजून घेऊ म्हणतो
तिच्या डोळ्यांमधून आता तिच्या आठवणींत हरवू म्हणतो
तिचे गोड हसू पाहण्या भिजत शोधलेला मोगरा
तिच्या प्रेमाने भरलेला तो चहा आठवतो का रे तुला?
किती रुसलो तुझ्यावर, किती भांडलो तिच्याशी
तरी पाणी डोळ्यांतले मात्र नकळत तू अन ती च पुसशी
केल्यास तू नेहमी नव्याने घट्ट रेशीमगाठी
आज भिजलो त्या आठवांत मी नि माझी काठी
शेवटची वाट चालताना वाटे हवा कुणी सहारा
एकल्या या सागराला सुखाचा तेवढाच किनारा
भिजवतोस मग मला तू, म्हणतोस आहे रे कुणी
ओल्याचिंब तिच्या स्मृती अन वाडकरांची गाणी