STORYMIRROR

Supriya Devkar

Tragedy Inspirational

3  

Supriya Devkar

Tragedy Inspirational

एक स्त्री जगते आहे

एक स्त्री जगते आहे

1 min
482

शंभर लढाया एकाच वेळी

 तोंड देत जगते आहे

किती घाव किती वेदना 

तरीही ती उभी आहे॥१॥


नकार कितीदा सोसला 

कितीदा आतून कोलमडली

तरीही नात्यांना सांभाळत 

कितीदा ती असेल रडली॥२॥


विरोध कितीदा पचवले

अपमान किती ते ओढवले 

तरीही पाऊल न अडखळता 

बंध भावनांचे तिने सोडवले॥३॥


आज उभी आहे जरी 

लावून खांद्याला-खांदा 

तरीही सुटले नाही तिचे 

उष्टी ,खरकटी आणि रांधा ॥४॥


तरीही ती बोलते आहे 

हसते आहे गाते आहे 

अभिमान तिच्या या बहुगुणांचा

 एक स्त्री जगते आहे॥५॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy