भाव सुमनांजली
भाव सुमनांजली
अचानक तू निघून गेलीस
मनास चटका लावून
आठवणी येतात दाटुन
डोळ्यात पाणी येतं भरून
पण तू दूर गेली नाहीस
हृदयाच्या आहेस कोपर्यात
कोणी दूर करू शकत नाही
निरंतर राहशील मनात
सदैव प्रेमळ शांत मूर्ती
सुखी समाधानी चित्त
संसारी तू रमून गेली
घरट्यात नित्य हसत
आयुष्यात प्रेमाचा ठसा
उमटवून गेलीस
प्रत्येकाच्या मनात तुझी
जागा ठेऊन गेलीस
समजले नाही देवाने
अशी परिक्षा का पाहिली
क्षणोक्षणी आठवत तुला
ही भावसुमने वाहिली
