असही एक प्रेम
असही एक प्रेम
ती रोज खिडकीत उभी राहून
त्याची प्रतिक्षा करायची
त्याला पाहिल्यावर
लपून जायची
ती केव्हांतरी दिसेल
म्हणून तो वाट बघायचा
पुन्हा पुन्हा तिच्या घरावरून
फेरी मारायचा
तिचा असाही त्रास त्याला गोड वाटायचा
गालातल्या गालात हसुन
निघून जायचा
अंस रोज चोरून लपून
बघतांना
ह्रदय ह्रदयाशी जुळत होतं
पण मन मनाशी मिळत नव्हतं
मनातल मनात ठेवून
तो तिला हळूवार तिरकसपणे
मान हलवून बघायचा
ती आडोसा घेवून
हसायची
पुन्हा तिला बघायला
तिच्या घरावरून
त्याची फेरी असायची
दोघांच एकमेकांवर प्रेम होतं
पण सांगता येत नव्हतं
न भेटता न बोलताही प्रेम होत राहील
तिला चोरून लपून बघण्यातचं आयुष्य दोघांच सरून गेलं
आजही तो तिच्या घराभोवती गिरक्या
मारतोय
फुलांनी सजवले तिचा हसरा फोटो बघतोय
आता ती मात्र त्याच्या आठवणीतच राहीली
असही प्रेम अजरामर करून
हे जग सोडून गेली

