वाटेवर काटे वेचीत चाललो
वाटेवर काटे वेचीत चाललो
वाटेवर काटे वेचित चाललो
वाट ती संघर्षाची
पुढे जाणाऱ्याला खेचीत चालले
सावरून काटे पाय पाऊले चालले
कुठे प्रेम तर कुठे द्वेष
प्रत्येक काटा वेगळा
कोणी काट्याने काटा काढण्यात
वाटेवर काटे वेचित चाललो
भूक वेगळी पोटाची
खळगी भरत चाललो
एकमेकांच्या व्देषात मी
वाटेवर काटे वेचित चाललो
शब्द धिराचा देत चाललो
काट्याने अपंग झाल्या वाटा
वाट सोनेरी बघन्यासाठी
वाटेवर काटे वेचित चाललो
जो तो आपल्या मस्तीत
काट्याची गस्त घालू लागला
रक्षण करण्या मी माझेच
वाटेवर काटे वेचित चाललो
झाले ओझे माझे मलाच
भार तो आता सोसवत नाही
हरवलेल्या वाटेवर
वाटेवर काटे वेचित चाललो
झाल्या तिन्ही सांझा
ती वाट काळोख झाली
अंधारमय जीवन संपवन्यासाठी
वाटेवर काटे वेचीत चाललो
