शाळेतील आठवणी
शाळेतील आठवणी
शाळेतील त्या आठवणी
कधीही न विसरू शकलो....
चार भिंतीत राहून
कधीही न दुखलो...
पुस्तक,वह्यांच खांद्यावर
असाच ओझ...
मन मात्र मित्रांन मध्येच
असायचं माझं....
टेंशन काय असतं
ते माहीतच नसायचं...
लक्ष मात्र शिक्षकासोबतच
नेहमी असायचं....
शाळेतल्या घंटेचा आजही
घुमतो कानात आवाज...
खेळातच रमून जायचो
आम्ही सर्व जिगरबाज....
आमच्या काहीच नव्हत्या
शाळेत असताना अपेक्षा..
विचार सोबतीला सारखे
फक्त वेगळ्या होत्या कक्षा...
सवंगडी,मित्र होते सगे
कधीच न केला दूजाभाव...
दुरावा झाला शाळा संपली
थांबली जसी किनारी नाव...
