सरी पाऊसाच्या
सरी पाऊसाच्या
बरसल्या पाऊसाच्या सरी
चिंब चिंब झाले सारे रान...
ओलाव्यात थेंबाच्या
हरवले सारे भान....
प्रतिक्षाचा तो पाऊस
मनाला गारवा देऊन गेला...
तहानलेल्या रानाला
पाणी पाजूनी गेला...
पक्षांचा किलबिलाट
रानात पसरला....
परत माघारी जाण्यास
पाऊस तो विसरला ...
पीक ती बहरली
सरी त्या पाऊसाच्या...
कष्टाचा तो घाम
हाती त्या शेतकऱ्याच्या...

