नवे स्वप्न घेऊनी परतेल
नवे स्वप्न घेऊनी परतेल
क्षणार्धात सूर्य गेला ढगाआड....
पाहिले होते क्षणार्धात.....
होता तर दिवस
काळोखाची मग झाली रात
पाहिलेल्या स्वप्नांची
जसी रात्र उलटूनी गेली
तो दिवस सजलेला
आठवण करुनी गेली
भर उन्हाच्या झळा
शोसवूनी गेली
मनाच्या वेदनेला
भासवूनी गेली
तापलेल्या जमिनीला
गारवा आला...
सूर्य तो अलगद
ढगाआड झाला...
नवे स्वप्न घेऊनी
परतेल तो...
काळोख रात्री
आठवेल तो...
स्वप्नांच्या पलिकडले
गाव कोणते असेल....
डोळे उघडताच
उगवणारा सूर्य दिसेल....