तु पडतोस असा की...
तु पडतोस असा की...
तु पडतोस असा की सार
रान न्हाऊन निघत...
इवले रोप मनोभावे
पाऊसा तुझी आठवण काढत....
तुझ्या येण्याने
पक्षात होतो हर्ष...
मातीला तुझ्या थेंबाचा
अलगद असतो स्पर्श....
तुझ्या आगमनाची
जेव्हा चाहूल लागते...
साऱ्या रानाची जणू
तहान भागते....
प्रत्येक ऋतू जरी
आम्हास असेल समान...
तुझ्यामुळे सृष्टी नटते
हिरवीगार जसी छान...
हवा सुटते अन्
रानातले पिके हलवते...
नभ भरून आले की,
तुझी चाहूल कळवते....
शब्दात न मांडता येणार
पाऊसा रूप तुझं निराळं...
थेंबा थेंबान बरसत तू
रानालाच अतित्व तुझं कळाल...
