पहिला पाऊस
पहिला पाऊस
वाट पाहावी लागणारी
ती वाट नवीन नाही...
पडणारा पाऊसाचा थेंब
तो ही नवीन नाही...
मलके जरी कपडे माझे
ते अंग उघडे नाही...
पहिल्या पाऊसात साचलं जरी पाणी
राणाचा त्याच्याशी दुरावा नाही...
कोण म्हणतो मी पडणार नाही
पडेल चिखलात
पाऊसाचा माझ्याशी वैर नाही
आस लागली जीवाला
त्या पाऊसाला विसनार नाही...
शेतकऱ्याच्या अंगी
कुठलाच आज त्याच्याशी
भेदभाव उरला नाही...
प्रतीक्षा जरी करावी लागली
येणं त्याने सोडले नाही....
हिरवेगार झाले रान
मोकळेपणा त्याने सोडला नाही...
