Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Gaurav Daware

Classics

4.7  

Gaurav Daware

Classics

वृद्ध प्रेम

वृद्ध प्रेम

2 mins
285


आठवत होत ते तरुणपण 

होती ती आणि होतो आपण 

लाजत हासत जुळलं आमचं मन 

असं होत माझं तरुणपण......


नकळत तिच्या प्रेमाची शान

म्हणजे माझा अलगत अभिमान

सुंदर जणू जिंकलीय युद्धातून 

एकटी ती आणि एकटं माझं मन.....


तरुणपणी ती माझ्या कवितेत रुचली

नकळत अलगत माझ्या मनात उतरली 

कवितेचे शब्द मात्र ओळींवर तुटली 

अन तीच माझ्या हृदयात नटली......


 तिच्यासाठी करायचो धाडस अफलातून

आवडायच तिच्यासाठी हरावं मनापासून

कराव तिच्यासाठी बोलक माझं मन

जिंकावं तिच्यासाठी जग हे संपन्न......


देहाचा अंत शेवटी होतो इथे

पूर्णजन्म तर फक्त कल्पनेचे श्रोते

आठवणीची नाती तिच इथे राहते

प्रेमाची वास्तविकता पुन्हा जन्म घेते......


तिच आणि माझं होत नात अनमोल

बहुतेक माझ्या शब्दांना नसेल कधी कवडीच मोल

पण दोन छोटे शब्दही माझे प्रेमाचे बोल

असा समज धरून ती नात माझं तोल.....


आता ती कुठे अन मी सध्या कुठे

स्वर्ग आणि पृथ्वी यातलं प्रेम जिथे जिथे

मृत्यू ओढहूनही ती कदाचित आनंदी नसेल तिथे

तुला खरं सांगू तर मलाही नाही करमत इथे......


म्हातारपणाचा आहे ग अचबच खेळ

आठवणीतुन होतो पुन्हा तुझ्याशी मेळ

कदाचित कोणाला नाही आपल्यासाठी वेळ

पण बोलाव वाटत तूझ्याशी जणू गोंधळातली भेळ...


तुझ्यासाठी मी होतो कधीकाळी बलवान 

दिशा होती एक आणि माझा एकच बाण 

मन होत तरुण अन मनात चावटपण 

असं होत माझं तुझ्यासाठी तरुणपण....... 


पण आता....... 


दुःखाच्या डोंगरात लपलेले मन 

अन या वयात हरलेल तण 

नाही शब्द नाही आपण 

आगळवेगळ माझं हे म्हातारपण........


नाही आता ते गोड शब्द 

झाली पूर्ण व्याधी भ्रष्ट

शरीर फक्त कूजुन स्तब्ध 

आगळवेगळ माझं हे म्हातारपण........


मुलगा गुंतलाय प्रपंच्याच्या जाळ्यात 

मित्र सापडले देवाच्या माळ्यात 

नाही आता शक्ती नाही आपण 

आगळवेगळ माझं हे म्हातारपण........


हळवं असत मन, हळवी ती भावना 

सुरुवात अन शेवटात असतो सारखेपणा 

तुझ्याशिवाय नाही गोड विचार नाही कुठल प्रेम 

आगळवेगळ माझं हे म्हातारपण........


कुजबुज करिती जग हे सारे 

रोगी असता सगळे म्हातारे 

मरतो आता सुखाशी राहारे 

आगळवेगळ माझं हे म्हातारपण........


आदर करतात चेहऱ्या-समोर 

मागे कपटी स्वभाव अन कपटी मन 

नाही उपयोग म्हणुन मार्ग वृद्धाश्रम

आगळवेगळ माझं हे म्हातारपण........

 

हरतोय आता जगाच्या पुढे 

मानस म्हणतो ती माणसं आता कुठे 

एकटाच मी आणि एकट माझं मन 

आगळवेगळ माझं हे म्हातारपण........

आगळवेगळ माझं हे म्हातारपण........


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics