रिमझिम रिमझिम धारा
रिमझिम रिमझिम धारा
अलगद मिठीत घ्यावं तू
रिमझिम रिमझिम धारात....
रात्र ही ओसरून गेली
तू पडतोय अजूनही दारात...
फुलांचा गंध दरवळूनी आला
तुला मग पाहण्यास...
स्पर्श तुझा छेदूनी गेला
हा निसर्ग पाहण्यास...
पक्षांनी आज घरटे नाही सोडले
तू दिसला त्यांना अश्रुत...
मोकळे व्हावे वाटे त्यांना
बंध त्यांचे तुझ्याशी अतूट...
आकाशातून पडतोय असा
धरणीशी तुझं नात....
पाऊस आला, पाऊस आला
धरणी जणू गीत गात...
अवघी धरती नटली,
सजली मग तुझ्या आगमनात...
कधीकाळी तीही होती
ओसाड,उन्हात....
मनात घर करूनी गेला
मन गुंतले तुझ्यात....
ओंजळ माझी कधीच भरली
नाही सामावला तू हातात...

