श्रावणी सोमवार
श्रावणी सोमवार
भक्तीचा जिथे नाद घुमतो
श्रावणी सोमवार होऊन जातो भक्तिमय...
महादेवाच्या गजरात
ओठांवर नाव घुमते, राहत नाही भय.....
श्रावणातल्य श्रावण धारा
देतात मनाला उभारी...
दुःख दूर करणारा
तोच पांडुरंग, हरि....
ज्योत आरती ची पेटूनिया
श्रावणाच्या गजरात नाचू या...
नामस्मरण करत शंभूच...
दुःखितांचे दुःख दूर करूया...
द्वेष मनातला काढू
समतेचे बीज फुलवूया...
महादेवाला प्रसन्न करण्यासाठी
संकल्प नवीन घडवूया....
