पाऊस
पाऊस
शेत झाले खुले
बरसण्यास पाऊसास....
जनावरे शिरली गोठ्यात
पिल्लांना पण पावसाची आस...
नद्यांना पाणी आले,
ओढ्यांना पाणी आले...
रस्त्याने पाणी पाणी झाले
मन ही ओलेचिंब झाले...
नात्यांच्या पलीकडे
मातीला ओलेपण आले...
पाऊसाच्या सरिने
रान ओलेचिंब झाले...
प्रत्येक थेंब थेंबाने
मातीशी तो लोळला...
पाऊस निसर्गाचा
माणसाची अद्भुत सोहळा...
आहे त्या ठिकाणी
जो तो पाऊसात भिजला...
साद हकेची
ढग पण अखेर गर्जला...
चिमणी पाखरू भिजून निघालं
पाऊस ओसरल्यावर गाणे गाऊ लागल...
हे रूप निसर्गाचं
सगळी कडे पसरू लागलं...

