आठवणींचे पडदे...
आठवणींचे पडदे...
जाळाव्या म्हटलं तरी जाळता येत नाहीत
आठवणींचे पडदे सरता सरत नाहीत....
सोडून द्यावं म्हटलं तरी मागे काही सोडून जातात
जाळल्या कितीही जरी... राख ठेवून जातात...
राखेचा मग धुरळा उडत राहतो आयुष्यभर
पापण्यातलं पाणी, मग धुसर करते नजर...
त्या राखेतून भरारी घेता येत नाही
आठवणींचे पडदे सरता सरत नाहीत.....