तिलाही मन आहे....
तिलाही मन आहे....
1 min
356
तुझं सुटलेलं पोट आणि वाढलेले वजन,
नजरेत भरलं त्यांच्या...
पण त्यामागचं हळवं - नाजूक मन
नजरेतून सुटलं त्यांच्या...
चूक तुझी नाही.....
त्यांनी गुन्हा केलाय.....
उणीव तुझ्यात नाही,
त्यांना जाणीव नाही...
त्यांच्यासाठी स्वतःला शिक्षा करु नको...
अमूल्य क्षण आयुष्याचे वाया घालवू नको....
शरीर तुझं... मन तुझं... इच्छा तुझी.... अपेक्षा तुझ्या....
कोत्या मनाच्या लोकांसाठी, स्वतःला छोटं करु नको