Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Ratna Wavhal

Romance

4  

Ratna Wavhal

Romance

ओल्या क्षणांची आठवण

ओल्या क्षणांची आठवण

1 min
293


कधी कधी वाटतं.... पावसात चिंब भिजावं...

कोसळणाऱ्या सरींना अलगद कवेत घ्यावं....


भरून आलेलं मन...आभाळासारखं रिक्त व्हावं....

कुणीतरी माझ्यावर.... माझ्यातकंच प्रेम करावं...


होऊ द्यावं शिंपण.... तुषारांचं अंगभर.....

ओल्या क्षणांची आठवण.... जपावी आयुष्यभर...


अलगद थेंबासारखं.....स्वार व्हावं सरींवर....

आकाशाशी नातं तोडून.... धाव घ्यावी धरणीवर....


अवखळ नदीसारखं....रानावनातून धावावं...

पर्वताचा उंबरठा ओलांडून....सागराशी एकरूप व्हावं...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance