कोरोना..परदेशी पाहुणा
कोरोना..परदेशी पाहुणा
कोरोना...
तू तर परदेशातला पाव्हणा..
पाहता पाहता वरसाचा झालास,
आता
कौतुक करू तर कुठल्या तोंडानं करू
ते तेवढं सांग..
कोण म्हणतंय आज तुझा वाढदिवस..
कोण म्हणतंय आज तुझा वाढदिवस..
आर आमच्या नजरत ह्यो हाय काळा दिवस..
खरं सांगायचं तर तुला मोठं न्हवतं करायच..
ठरलं व्हतं आल्या पावली तुला माघारी धाडायचं..
गल्लोगल्ली, गावच्या गावं ऐशी साऱ्या बंद केल्या..
पाव्हणं पय, सुखं दुःख, नातीगोती कुलूपबंद झाल्या...
चार भिंतीत कोंडून घेत आम्ही तुला घाबरत राहिलो..
तू मात्र गावगाडा ढासळत सगळीकडं हिंडत राहिलास..
आन पाण्याला, रोजी रोटीला आमी सारी मुकत राहिलो..
तू मात्र आमचीच माणसं आमच्या पसन ओरबाडून नेत राहिलास..
आर लग्नाला पन्नास, मयताला वीस..
अशी कुटली काढलीस रे खुन्नस..
आता एक वर्षांनं मोठा झालास..
सांगतोय तेवढं जरा नीट ऐक..
झाल तेवढं पूर झालं..
थांबव आता गावभर धुंडाळायचं..
जगू दे परत एकदा रितीरिवाजापरी...
अर्थव्यवस्थेनं कोलमडून गेलीय र दुनियासारि..
भीक मागायची वेळ आली गोर गरीबावरी
खरंच सांगतो माणसा माणसातली रंगतच लई न्यारी..
आम्ही या भारतभूमीचे
वारकरी, धारकरी, माळकरी
हात जोडून विनवणी करतो सारी
आल्या पावली जा माघारी...
आल्या पावली जा माघारी...
