STORYMIRROR

Leena Yeola Deshmukh

Tragedy

3  

Leena Yeola Deshmukh

Tragedy

अवकाळी पाऊस

अवकाळी पाऊस

1 min
379

नभ दाटून येतात

ये रे ये रे पावसा

लहान मुले म्हणता

नाचता बागडतात !!


पाऊस सरी बरसल्या

बळीराजा सुखावला

नटली वसुंधरा माता 

पिके भारीच डोलतात !!


विज्ञानाची कास धरत

मानव विकास करतो

निसर्गाच्या विरुद्ध जाता

आपत्ती त्या ओढवतात !!


बदलते नैसर्गिक चक्र

येतो अवकाळी पाऊस

सारेच पिके वाहून जाता

कष्ट केलेले वाया जातात !!


भयानक महापूर येतो 

कित्येकजण बेघर होतात

विस्कळीत दृश्य बघता

नयनी अश्रू तरळतात !!


पिकांसाठी कर्ज काढून 

कठीण परिश्रम करतात

आर्थिक फटका बसता

गळा फास लावतात !!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy