STORYMIRROR

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Tragedy

3  

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Tragedy

व्रण इतके अंतरी

व्रण इतके अंतरी

1 min
335

दिलेस कां तू मजला

व्रण इतके अंतरी

नको नाट्य सांत्वनाचे

घाव लागती जिव्हारी..


हाती गुलाब घेताना

बोच जाणवे काट्याची

जाणशील कां वेदना

माझ्या पोळल्या मनाची..


गोठलेल्या जाणिवांना

आता ना तमा कशाची

मागे सोडून उसासे

वाट चालतो नव्याची


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy