शब्द माझे सोबती
शब्द माझे सोबती
शब्द माझे सोबती झाले
सगळे मला विसरून गेले
तुझ्या माझ्या प्रेमाचे ते क्षण
हवेत विरघळून गेले
साथ मला हवी तुझी
मला काळजी आहे तुझी
तु गेला सोडून मला
त्या शब्दांनी कळले मला
तुझ्याशिवाय कशी राहू
किती तुझी वाट पाहू
माझ्या मनात तू होतास
माझ्या प्रत्येक शब्दात होतास
आता शब्द हेच माझे सोबती
शब्द कधी देत नाही अंतर
तुझे शब्द मला आठवतात
हेच शब्द माझ्यासोबत निरंतर
