STORYMIRROR

Shravani Balasaheb Sul

Tragedy

3  

Shravani Balasaheb Sul

Tragedy

का...?

का...?

1 min
403

धूरकट धूरकट आठवांमध्ये, कोणे चित्र स्पष्ट का पहावे

एकाच जागी अडखळणाऱ्या, दिशाहीन प्रवाहात का वहावे

विसरून आजचा सूर्य नवा, का‌ रातच्या चंद्रास स्मरावे

गतिशील असता पावले, देहाने का मागेच ऊरावे

भूतकाळच्या भविष्याचे, का शोधावे आज पुरावे

प्राण सुटल्या सुमनाच्या, सुगंधासाठी का झुरावे

व्यतित जीवनात जगूनी, क्षण क्षण का व्यथित व्हावे

सैरभैर होऊनी मन, का वाट परतती धावे

बघता विझता दिवा, का तळहाताचे कवच करावे

नाकारून जगणे नव्याने, मृत्यूस का मुठीत धरावे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy