STORYMIRROR

Prem Gaikwad

Tragedy

3  

Prem Gaikwad

Tragedy

अन्याय होणार न्हाय..

अन्याय होणार न्हाय..

1 min
394

वकिलांनी सत्याला जर

दिला मिळवून न्याय ,

तर मला वाटतं अन्याय

 मुळीच होणार न्हाय...


प्रत्येक जण विकल्या जातोय

गरीबांवरच अन्याय होतोय ,

रक्षणकर्ते चं भक्षक झाले

कायदा सर्वांना समान हाय...


पैसेवाल्यांना आलाय माज

गुंडांचंच आहे सारं राज,

खोट्याच्याच पाठीशी सारे

सत्ये इथं चालतंच न्हाय...


राजकारण्यांचं राजकारण

गरीबांचे रोज आहे मरण,

कित्येक अशाच पिढ्या गेल्या

आम्हाला कोणीच वाली न्हाय...


कायदा इथं विकल्या जातोय

डोळे असून आंधळे होतोय,

किती फोडावा टाहो आम्ही

किती कुणाचे धरावेत पाय...


पोलिस, वकील,राजकारणी

यांची सारीच काळी करणी,

काळेच धंदे या लुटारुंचे

खऱ्या ची माय वनवासाला जाय...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy