पेन किलर
पेन किलर
पेन किलर
आज घेवून बघते..
खूपच हातपाय गळून पडलेत,
प्रचंड वेदना होत आहेत..
कदाचित पेनकिलर ने कमी होईल त्रास..
पण नेमके खरे शारीरिक वेदना आहेत की नाही
हे मात्र माहीत नाही...
बहुतेक मोडलेल्या मनाच्या
दुखण्याचा आक्रोश शरीर करतय...
बंद पडलेले हृदय सुद्धा उगाच धडधड आवाज करत बसत,
आणि श्वास आपले नुसतेच त्याला साथ देत राहतात...
बघते तरी पेनकिलर घेवून
निदान शारीरिक वेदना तरी कमी होतात का ते..
