STORYMIRROR

Dr Reshma Bansode

Drama Romance

3  

Dr Reshma Bansode

Drama Romance

मन

मन

1 min
663

मनासारखे स्वार्थी कोणीच नाही,

जरा ओलावा जाणवला की पटकन विरघळून जात,

हृदयाची तर जरा परवाह करत नाही,

हृदय मोडले की मग मात्र अंधारात लपून बसत...


मनासारखे स्वार्थी कोणीच नाही,

समाधानाच्या शोधात वेडपीस होत,

क्षणिक आनंदाला कवटाळून बसत,

नंतर हृदय दुखावले की चिडीचूप होवून बसत...


मनासारखे स्वार्थी कोणीच नाही,

प्रेमाच्या काही क्षणांसाठी प्राण सोडून बसत,

हृदय बंद पडले की मग निस्तेज होवून पडत ...


मनासारखे स्वार्थी कोणीच नाही,

ओल्या प्रेमाच्या स्पर्शाची पुन्हा वाट पाहत बसत...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama