बेड्या
बेड्या
आठवणींच्या बेड्या
जेव्हा पुढे चालू देत नाही,
असहायतेच्या जखमा
अपंगत्व बहाल करतात,
बंद दरवाजाच्या फटीतून
अंधारच दिसतो...
उजेडाच्या किरणाची अपेक्षा नष्ट होते,
बंद आणि चालू श्वासात काही अंतर राहत नाही..
आपल्या अस्तित्वाच्या संभ्रमात पडून राहतो,
आशा निराशा सगळ्याच्या पलीकडे जातो..
भकास कोरड्या आयुष्यात
आक्रोश गिळून राहतो,
आठवणींच्या बेड्या जेव्हा पुढे चालू देत नाही ...
