पाऊस
पाऊस
आणि मग आज आलास तू..
नेहमी प्रमाणे गजर करत,
गोंधळ घालत आलास..
काय तुझा असा स्वभाव ?
खरचं स्वभावाला औषध नाही !
किती वाट पाहायला लावलीस ?
तुझ्या आठवणी सतत छळत होत्या..
विरहाचे चटके सहन करत कसे दिवस घालवले माझे मला माहित..
पण तुला त्याचे काय ?
अरे तक्रार करायला तरी उसंत दे,
चिंब भेजवलेस की मला
नेहमप्रमाणेच...
असा कसा रे तू ...
अचानक येतोस ,हक्क गजवतोस...
अन् मला पुनः वेड लावून निघुन जातोस...
या वेळी निदान मला
आपल्या भेटीचा मनमुराद आनंद घेऊ दे,
शरीराचा मनाचा सगळा दाह
शांत होऊ दे...
आणि मग जा पुन्हा निघून
नेहमप्रमाणेच,
तुझ्या आठवणींचा ओलावा
माझ्या रोमारोमात समावून...
मला परत एकदा तुझ्या प्रेमात वेडे करून..

