ती रात्र
ती रात्र
अशा त्या भयाण राती,
काय खेळविली निती
त्या स्थळी फाटली धरती,
आणि ज्वाळा भडकोणी उठती,
जन गेले गाडूनी खालती,
तेथं दिसे आता फक्त माती
काढीली प्रेते उकरुनी,
पण वाटे चीतेतील प्राणी
आठवूनी तो प्रसंग मना रे,
अंगावरी उभारी शहारे
कोण म्हणे केली करणी,
कोण म्हणे रागावली धरणी
कोण बोलती शास्त्रीय कारणी,
तर कोण सांगे येवूनी गेला राक्षसी प्राणी
कोण आले कोण गेले,
काय घडले कसे झाले
हे सर्व गुपीतच राहिले,
पण गाव मात्र उजाड झाले
