भावना
भावना
माझ्या भिजलेल्या पापण्यांना
किती वेळा पुसू सांग ना
तुझ्या साठी मन माझं झुरतं
एकदा तरी तू भावना जाणना....
समजून घेतले नाहीस कधी तू
माझ्या मनातील प्रेमभावना
जीव ओतला तुझ्यावर किती
तरी तुला माझे प्रेम दिसेना....
>
जीव तयार आहे तुझ्यासाठी
गरज पडेल तेव्हा मागून घेशील ना
माझं तुझ्यावर किती प्रेम आहे
हे न सांगता तू ओळखशील ना .....
एकदा तरी माझ्यावर उपकार कर ना
माझ्या मनातील भावना
माझ्या डोळ्यातील आसवतल्या
वेदना ओळखून तर बघ ना .....