स्त्रीमनाला जपताना
स्त्रीमनाला जपताना
स्त्रीमनाला जपताना
रूसतात इच्छा काही
सांजवेळी एकांतात
कुजबुज सुरू राही.......१
इतकेही कळू नये
माझ्या स्वकियांना बरे
कौतुकाचे दोन बोल
ओंजळीत द्यावे खरे......२
घरादारा गोंजारता
तिला उणीव भासते
तिच्या केसांची मालीश
क्वचितच गं होतसे........३
आभाराच्या पत्रकाची
तिला अपेक्षा नाहीच
व्यस्ततेच्या रिंगणात
नसे प्राधान्य कधीच.......४
घर सारं फिरतयं
तिच्या वलयाभोवती
तिच्याकडे पाहण्यास
दृष्टी येईना वरती........५
स्त्रीमनाला जपताना
किती वेदना नांदल्या
तिच्या संसाराच्या विश्वी
संवेदना काहुरल्या........६