STORYMIRROR

PANKAJKUMAR THOMBARE

Tragedy

3  

PANKAJKUMAR THOMBARE

Tragedy

हिरोशिमा दुसरे महायुद्ध

हिरोशिमा दुसरे महायुद्ध

1 min
219

  हजारो ने बळी गेले तुझ्या रागात नाही का

उडाली राख स्वप्नांची तुझ्या स्फोटात नाही का

कसे पेटून गेले प्रेमही आगीत देशांच्या

निघाले प्रेत प्रीतीचे तुझ्या युद्धात नाही का


मुलांनाही कसे सांगू अता मी पाठ शांतीचे

भविष्याचे इथे तारेच काळोखात नाही का

स्मशाना सारखे झाले कसे आयुष्य माझे हे

जळाले सर्वकाही रे तुझ्या जाळात नाही का


कुठे बर्फात जाऊ मी मनाच्या शांततेसाठी

मलाही घाल ना गोळी इथे डोक्यात नाही का

विमानाने कसा पाहून गेला नाच मृत्यूंचा

इथे माणूस आहे तो तुझ्या देशात नाही का


असा घेऊन प्राणांना कसा जिंकून गेला तू

जरा थोडाच ओलावा तुझ्या डोळ्यात नाही का


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy