आनंद तूझाच बाळा
आनंद तूझाच बाळा
अचानक सगळं शांत होते, आणी तूझाच चेहरा समोर येतो
मग भयाण शांततेत, कित्येक वेळ असाच निघून जातो
तु टक लाऊन असे पाहीलेस, की मला सारे समजले
नजरेने केलेली भाषा, मला आता अलगद उमगते
तूझ्या नवरस भावना, साऱ्या मला आवडतात
अपेक्षित अश्या साऱ्या, त्या आठवणी मग साठतात
तु तु तु आणी तूच बाळा, बाकी सुचत नाही काई
सद्य आयुष्य खर्च केले, हेच सुखं पाहण्या पाई
भक्ती माझी खरी, पांडुरंग माझा तो काळा
बालरुपी घर गोकुळ झाले, आनंद सारा तूझाच बाळा

