STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Romance

3  

Abasaheb Mhaske

Romance

मी रडून घेतो मनसोक्त.. .

मी रडून घेतो मनसोक्त.. .

1 min
14.5K


मी रडून घेतो मनसोक्त ...

आठवण तुझी आल्यावर 

तुला येत असेल का ? माहित नाही पण ...

आठवशीलच मला तू मी जग सोडून गेल्यावर 


हि रीतच असते ग जगाची ...

व्यक्ती जवळ असल्यावर किमंत नसते 

ती निघून गेल्यावर तिची आठवण छळते 

मेल्यावरच ती का मोठी होते ? कोडे ना उलगडते 


जाऊ दे ग तू फार नकोस मनाला लावून घेऊ 

कितीही आठवण आली तरी .. नको जगाला दावू 

जग हे फार वाईट असत ग .. ते सुखानं जगूही देत नाही 

अन मरूही देत नाही फक्त एवढं लक्षात ठेव ...


जा ग मनावर दगड ठेवून .. दिल्या घरी तू सुखी रहा 

काहीही झालं तरी तेच आता तुझं सर्वस्व ...

भूतकाळ विसरून भविष्याची वाटचाल तुझी सुकर होऊ दे ...

तुला उदंड आयुष्य लाभो ,नांदा सौख्यभरे ... हीच ईश्वरचरणी प्रार्थना ...





साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance