STORYMIRROR

Sanket Potphode

Romance

4.7  

Sanket Potphode

Romance

तू आणि मी

तू आणि मी

1 min
15.1K


पावसाच्या धारा कोसळल्या भुईवरी

थंड थंड सरींवर सरी

ढगाळ वातावरण मंद वारा

सुगंध ओल्या मातीचा दरवळणारा


घेतले अंगावर तुषार ओले

आठवले ते दिवस जुने

पहायचो अविरत कोसळणाऱ्या धारा

कधी थेंब कधी गारा


गरम चहा कांदा भजी

सोबतीला जोडी तुझी माझी

निरंतर गप्पा हातात हात

सहज करायचो वेळेवर मात


भिजतो मी तेच आठवून

स्वैर स्वच्छंद, भान हरपून

आजही भेटतो त्याला अवश्य

त्यानेच खुलविले आयुष्यात इंद्रधनुष्य!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance