STORYMIRROR

गोविंद ठोंबरे

Romance

3  

गोविंद ठोंबरे

Romance

मोहिनी

मोहिनी

1 min
14.1K


सरसावतात सावल्या माझ्या

तुझ्या पाऊलखुणा छेडण्या

पैंजणी छनकार छनकतो तुझ्या

स्पंदनी हुंकार हृदयी पेटण्या


बेदरकार नजर हरिणी तुझी

बेमिसाल कांती शहाराया

मोगराही शरमेल अवचित

गंध तुझ्या तनूचा अत्तराया


लाजमी आहे चाल तुझी ती

पाठमोरी अवखळ काया

चातकी नजर लवलवती

सावज शिकार करवाया


धार अशी नयनी पातीची

गर्द काजळी घाव घालण्या

सरकार गुलाम मग झाले

वेणीत फुलवर्षा माळण्या


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance