STORYMIRROR

Trupti Naware

Others Romance

3  

Trupti Naware

Others Romance

काटेरी वसंत

काटेरी वसंत

1 min
14.4K


एकदा तरी मागितलेस कां

काही मागणे

माझ्या पाशी...

स्वखुशीने दिले असते

सारे काही

तुझ्या पाशी,..

पराग पिवळे

स्वप्नातल्या फुलांचे

आजही वेचते

सकाळच्या उशाशी...

मनाच्या ओळखीचा

अखेरचा चेहरा

ओवाळीते त्यास

कवीतेत रोजनिशी

एकान्त जरी कोपरा

माझ्या हृदयाचा

सजवला नाही तो

फक्त मी स्वतःसाठी..

सांजसावल्या

गुलमोहराच्या

मनोमनी धारणा ती

देव्हार्यातल्या चिंतनाशी

चिंतीते मी तयासाठी....

कधीच विसरणार नाही

स्वतःच स्वतःला

बर्याचदा केलेल्या सांत्वनाशी...

प्रेषीत शोधते

शब्दा शब्दात

प्रतिभेच्या बळानिशी...

हिसकावलेस स्वप्नपंख

उडण्याआधी डोळ्यातूनी

एक पाकळी

काटेरी वसंतात

दिलीस तिही कोमेजूनी...!!!!!


Rate this content
Log in