STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Romance

3  

Abasaheb Mhaske

Romance

तुझी आठवण ..माझी लेखणी

तुझी आठवण ..माझी लेखणी

1 min
14.5K


तुझी आठवण ..माझी लेखणी ,.कसलं नातं ?

तू नकोशी ,निरंतर छळणारी हवीहवीशी ... 

काही - काही कळत नाही माझ्यासाठी तू 

मनाची तगमग ,कधी जगण्याची उभारी ...


मी लिहत राहतो नित्यनेमाने 

भारावल्यागत बेभान होऊन ...

मी लिहता होतो तेव्हा ..

तूच असतेस त्यात न राहवून ..


माझ्या लेखणीतून तू आकार घेतेस 

तुझा सहवास , तुझी आठवण ...

अन नकळत साकारत जातेस तू 

माझ्यासाठीच तुझं समर्पण ...


तुझ्याविषयीच्या हरेक भावना 

मग बरसात राहतात पाना - पानावर ..

खपली काढून भळभळणारी जखम होऊन 

मी वेडापिसा होतो तुझी आठवण आल्यावर ...


शब्द - शब्दातून टिपकत राहतात 

तुझ्या विरहाचे आसू शाई बनून ...

मी मुली लिहतंच नाही वाटत ...

माझं मनंच आक्रन्दन प्रसवत


माझा प्रत्येक शब्द नि शब्द असतो

आपल्या नात्याचा जिवंत साक्षीदार 

जीवघेण्या आठवणी , नाजूक स्नेहबंध 

माझ्या लेखनावरची तुझी अनिर्बंध सत्ता  


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance