सतत तुझे ते गोड हासणे
सतत तुझे ते गोड हासणे
सतत तुझे ते गोड हासणे
अन मध्येच लाजुन पाहणे
घायाळ करते जीवा तरी
आवडते मला खरोखरी
अशीच रहा तू सदाफुली
गुलाब लेवूनी गालावरी
जाई फुलवून हनुवटीवरी
कमल कळी नाकावरी
बांधा सडपातळ जरी
कमलाक्षी भुवया वरी
वेणी शोभते केसांवरी
गौर वर्णी नाजुक परी
बोल तुझे गोड मधुर
शोभे हास्य खळीदार
दावीते मोती चमकदार
बोलणे जणू वाकबगार
विचार तूझे प्रगल्भ फार
आचरण अल्लड अलुवार
मंत्र मुग्ध करशी सत्वर
असेच तुझे रूप खरोखर

