स्वप्नमहल
स्वप्नमहल
स्वप्न महाली मी जागले
अधराचा हवा स्पर्श तुझा
हुंकार श्वासाचा गंध नवा
कोंडला तुझ्यात श्वास माझा
अलग ओठ अलगद
मकरंद रस तू प्राशिता
धुंद तुझी ओढ मज
हवा गुलाबी गारवा
खुले माझी कळी कशी
स्पर्शाने ह्दयी वसंत
सडा पडे प्राजक्ताचा
तनु ही तुजवरी आसक्त
रात्रीचा प्रहर हवा
चांदणी पिते चांदवा
डोलते यौवन तिथे
ऐकतो जिथे मारवा

