STORYMIRROR

गोविंद ठोंबरे

Romance

3  

गोविंद ठोंबरे

Romance

चोर प्रपंच !

चोर प्रपंच !

1 min
13.7K


इशाऱ्यानेच बोलतो इशाऱ्यानेच सांगतो

तीचे पैंजणेही बोलतात मी सर्वकाही जाणतो

अबोल गाणे अमुचे अबोल होऊनि गातो

सुमधुर तराणे निघतात दोघेच गुपित ऐकतो


डोळ्यात नजारे दिसतात डोळ्यातच दोघे पाहतो

मिटलेल्या पापण्यात मग दोघेच मिठीत बिलगतो

ओठांचे स्वर भिजलेले ओठांवरच आम्ही चाखतो

गालावरचे हासणे चोरून नजरेचे घास भरवतो


सावलीच्या पदराखाली सावल्या घेऊनी फिरतो

हातात हात कसले तळहातावर लाजणे धरतो

केसात गजरा तिच्या मी वेलीच्या पानांवरच माळतो

मी अलगद वेचून सुमने तिच्या वृंदावनात दिसतो


स्वप्नात जसे की आम्ही स्वप्नागत सोबत राहतो

रातीस उशाशी येऊन डोळ्यांवर फुंकर घालितो

हा चोरटा प्रपंच आम्ही चोरपावली रोज सजवतो

ती प्रपंचात सुखी माझ्या,मी माहेरी रोज तीच्या जातो



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance