चेहरा
चेहरा
प्रेक्षकांसाठी नटाचा हासणारा चेहरा
रोज रात्री आसवांना ढाळणारा चेहरा
दु:ख त्याला सोसवेना काळजाच्या आतले
तत्व मोठे जीवनाचे सांगणारा चेहरा
टोचणारे घाव होते चेहर्यावर चांगले
मुखवट्याने वेदनांना झाकणारा चेहरा
फाटलेले वस्त्र होते आत त्याने घातले
मार्ग सत्याचा कधी ना सोडणारा चेहरा
प्रेम नाही भास होता स्वप्न माझे रंगले
चंद्र अवसेचा निघाला लाजणारा चेहरा
रोज थापा मारतांना भावनांशी खेळतो
चेहऱ्यावर चेहर्यांना लावणारा चेहरा
तापले होते उन्हाने ते नदीचे काठही
बघ नदीचा थंड पाणी पाजणारा चेहरा
