दुःख
दुःख
दुःखाची संपणार रात्र
गरीबीचा होणार अंत,
सारं काही निट होण्यास
कारणीभूत असतील संत
तोच आपला सखा आणि
तोच आपला सोबती,
नको ठेवू आतातरी
मनात कशाचीच भिती
करीत राहणे कर्म हे
आद्य कर्तव्य आपले,
नशिब वाईट की चांगले
तयावरी जाणार मोजले
करु नकोस ही अशी
साऱ्या जमा खर्चाची घाई,
कधी तरी जीवनात हा
पाप पुण्याचा हिशोब होई
दुःखाची संपणार रात्र
गरीबीचा होणार अंत,
सारं काही निट होण्यास
कारणीभूत असतील संत
