बोधिसत्व
बोधिसत्व
निळा सूर्य हा उगवला
दलितांच्या रक्तात मखलेले,
रान पाहून रुद्रजोलन झाला.
ज्ञानाचा मोतीबिंदू चमकला.
जाडातून उखाडून टाकले गुलामीला.
शुद्धाच्या हाती सरस्वती.
पेचाटले मनमती.
भक्त आणि भिकारी,
ठोकारली ही रीती,हो आम्ही ज्ञानधारी.
शिक्षण तलवारीच पात.
कपावा भेदभावा आणि जात
शिक्षण हे एकमेव उताण्ड,
ज्ञान भूक प्रचंड,
अस्पृश्य हा जंग दुडकावून,
भीमाने केले निर्मळ जण.
असा समाज घडवावा.
दगडला सोडून त्यानं माणुसकीला पूजावा.
उठा सत्व हे लुटलंय,
जिवंत पणी मन तुमचं मेलय,
खाचेलेल्या उर आणि स्वभिमान तुम्हाला चेतवतोय.
स्त्रीला गुलमीची जाणीव झाली पाहिजे
त्यातून मुक्त होण्यासाठी ती शिकली पाहिजे
घडूवू हक्काचे, अस्तित्व.
भीमाचे झुंजार ज्ञानदीप, धडधडत हे रक्तात, बोधिसत्व.
