जपून रहावे ....
जपून रहावे ....
अजगर नगरी ... दुनिया सारी ,
जपून रहावे , श्वास रोखून .
घालील झडप ... ' आ ' वासून ,
सुस्तावलेलं बघून सावज .
हपापलेले डोळे सारे , निर्दावलेली आतडी ,
सारंच करील , एकदा गिळंकृत .
अजगर नगरी ... दुनिया सारी ,
जपून रहावे , श्वास रोखून .