कामाची ओढ
कामाची ओढ
लागली ओढ मला
शेतीच्या कामाची
राब राब राबताना
झीज होई अंगाची
लागते एकच ध्यास
कधी जाईन रानात
काळ्या आईची सेवा
करतो मी ऊन्हातान्हात
आज करताना काम
उद्या पिकेलं शिवारं
हिच आशा बाळगून
मेहनतीला आहे तयार
अंग मेहनत करून
घाम गाळीन शेतात
आयूष्याचं करून पाणी
जिरविन या मातीत
पिकं सारं पिकल्यावर
वादळापासून वाचवीन
जेव्हा येतील चार पैसै
त्यातूनच घर चालवीन
