माझ्या आठवणी
माझ्या आठवणी
घरात झालेले झुरळ
पेस्टकंट्रोल बोलावले
घर बंद करून सर्वांनी
गावाला जायचे ठरवले
काम होते चालू घरात
बाहेरच होतो सारेजण
कामासाठी गेले आत
वासच घुसला ठसकन
श्वास झाला बंद माझा
तोंडातून श्वासाचा भार
शेजारी डॉक्टरचे मग
ठोठावू लागलो ना दार
उठले एकदाचे डॉक्टर
वाफ घेण्यासाठी बोलले
तितक्यात त्या माणसाने
दाराचे लॅच लावून घेतले
शेजारच्या घरात नव्हता
स्वयंपाकासाठीचा गॅस
पंप मारला स्टोला तिने
तोपर्यंत अडकला श्वास
होता गरमपाणी स्टोव्हवर
घेतली मी एकदाची वाफ
नाक झाले मोकळे माझे
फुफ्फुसेही झालीच साफ
मुक्ततेच्या खऱ्या आनंदे
हरखले माझे पती न् मुले
पेष्टकंट्रोल होण्या्यावेळी
सदा हास्याचे फवारे फुले