STORYMIRROR

Rohit Khamkar

Fantasy Inspirational Thriller

4  

Rohit Khamkar

Fantasy Inspirational Thriller

मनात खुप साठतंय

मनात खुप साठतंय

1 min
414

आज खुप उदास वाटतंय, कोणाचच वागणं नाय पटतंय

बोलायचं काय अनं कुणाला, पण मनात खुप साठतंय

सगळं स्थिर झालय, वेग मंदावलेला जाणवतंय

विचारांचा काहूर असा, मनात प्रश्न उठवतंय

माहीत असणारी ती, सारी उत्तरे पुन्हा शोधतंय

बोलायचं काय अनं कुणाला, पण मनात खुप साठतंय

भिती आणि दहशती समोर, अस्तित्व माझ झूकतंय

सत्याच्या समशीरीच पान, मध्येच मग वाकतंय

झोपलेल मग दुखः माझ, अचानक असं जागतंय

बोलायचं काय अनं कुणाला, पण मनात खुप साठतंय

परिस्थिती गंभीर जिथे, कोण मदत मागतंय

काही चांगले काही वाईट, हेच मी सांगतंय

प्राकृत परखड आयुष्य, तेच काय मी जगतंय

बोलायचं काय अनं कुणाला, पण मनात खुप साठतंय

खुप झाल्या ऐकेरी पगड्या, सामान्य माणूस म्हणून जगतंय

सारं काही त्याचा बोकांडी, असा पुढारी वागतंय

सगळं ज्यांच्या त्यांच्या सोयीने, हेच मी पाहतंय

बोलायचं काय अनं कुणाला, पण मनात खुप साठतंय

Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy