माझ्या मराठीची किर्ती
माझ्या मराठीची किर्ती
सोज्वळ, सुंदर, कणखर, अवर्णनीय तिची महती
चमकती जणू गद्य आणि पद्य साहित्याचे मोती
अथांग सागरासम विशाल पसरली तिची ख्याती
किती गाऊ मी माझ्या
मराठीची कीर्ती
मधापेक्षाही मधाळ आणि रसाळ माझी मायबोली
पोवाडे, किर्तने,भारुडे, चारोळ्यांच्या बहरल्या जणू वेली
रत्नजडित अभंग, ओवी अमृताची सखी
चारी वर्णातूनी फिरे
सरस्वतीची पालखी
किती गाऊ मी माझ्या
मराठीची कीर्ती
ज्ञानोबा, तुकोबा गाजवी आळंदी
वारकऱ्यांची भजने,मातेची अंगाई ,नर्तकीची लावणी नवरसाच्या खताने
दरवळलेली ही माती
किती गाऊ मी माझ्या
मराठीची कीर्ती
शास्त्राची जाण इथे, संताची अमृततुल्य वाणी
भोसले, पेशवे, सावरकर यांच्या
शौर्याची ऐकायला मिळते कहाणी ज्यांच्या बलिदानाच्या रक्ताने धन्य झाली ही मराठी माती
अश्या शूरवीरांची महती आता वर्णावी तरी किती
किती गाऊ मी माझ्या
मराठीची कीर्ती
अभिमान ती, स्वाभिमान ती,
मनात ती, ध्यासात ती,
जगण्यात ती वाटे एकच खंत
परीजनाशी का लेखी तुच्छ तिला परकीय भाषेशी?
