भारत माता
भारत माता
मातीचा रंग निराळा,
निराळाच गंध
रंगारंगामध्ये वेगळाच भासतो एक भावबंध
आढळून येई जरी भिन्न वेशभूषा
ह्रदय एकच पण ओठांवरती जरी भिन्न भाषा
काही कठीण, काही सोप्या
भाषांमध्ये घुमतसे सूर एक ओघवता
प्रिय असे आम्हाला ही
पवित्र माती
असे प्रिय आमची भारत माता
अनेक नावे, अनेक रंग, अनेक रूपरेषा वर्णन करता कधी न संपणारी तिची अखंड गाथा
शूरवीर, क्रांतिकारी, पराक्रमी
या मातीत जन्मले वीर योद्धे स्वातंत्र्यसेनानी
देशासाठी प्राण अर्पण केले
इतिहास घडवला पुन्हा अमर होण्यासाठी
थोर तुझी कीर्ती किती सांगू सर्वांना इतिहास आज सुवर्ण अक्षरी लिहिला
घडली क्रांती झुगारून अन्यायाला
शहीद झाले अनेक स्वातंत्र्य मिळवायला
करिते मी नमन माझ्या भारत मातेला धूळ मस्तकी लावूनी टिळा
डोंगर दरी, कडीकपारी गीत गात असे झरी, निर्झरी
कुठे वेदना, कुठे उभारी, हसते सृष्टी नवरसधारी
सोज्ज्वळ, सुंदर, कणखर अशी आमची भारत माता
वर्णन करता कधी न संपणारी तिची अखंड गाथा..
